आमचा इतिहास
विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार व सोप्या शैक्षणिक पुस्तकांची निर्मिती करण्याच्या उद्देशाने अथर्व कुणाल प्रकाशनाची स्थापना झाली.
“अथर्व कुणाल प्रकाशन” ची स्थापना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला अधिक सुलभ आणि यशस्वी बनवण्याच्या ध्येयाने करण्यात आली. सुरुवातीच्या काळात आम्ही मर्यादित पुस्तकांपासून वाटचाल सुरू केली, पण विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे आणि पालकांचा विश्वास यामुळे प्रकाशनाने सातत्याने प्रगती केली. शिक्षण ही फक्त माहिती देण्याची प्रक्रिया नसून ती मुलांच्या विचारक्षमतेचा विकास करण्याचं साधन आहे, या जाणिवेतून आमची प्रत्येक पुस्तकं तयार केली जातात. सोप्या भाषेत, स्पष्ट मांडणीसह आणि आकर्षक रचनेसह तयार केलेली पुस्तकं मुलांना केवळ अभ्यासातच नव्हे तर स्पर्धा परीक्षांच्या तयारीतही उपयोगी ठरतात.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंतही दर्जेदार शैक्षणिक सामग्री पोहोचावी यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहिलो आहोत. गेल्या अनेक वर्षांच्या प्रवासात “अथर्व कुणाल प्रकाशन” ने हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात सकारात्मक बदल घडवले आहेत. आज आम्ही अभिमानाने सांगू शकतो की, आमची पुस्तकं केवळ अभ्यासासाठी नव्हे तर ज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी खरी मित्र ठरली आहेत.
आमचा इतिहास
आमचं ध्येय म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला, मग तो ग्रामीण भागातला असो वा शहरी भागातला, दर्जेदार शैक्षणिक साहित्य सहज आणि परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देणे. शिक्षण हे केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठीच नव्हे तर विचारशक्ती विकसित करण्यासाठी आणि आयुष्यभर उपयुक्त ठरणाऱ्या ज्ञानासाठी असते, हा आमचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे आमची पुस्तकं विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासात मदत करत नाहीत, तर त्यांच्या आत्मविश्वासात भर घालतात आणि शिकण्याची आवड निर्माण करतात. मुलांना प्रश्न समजायला सोपे जावेत, त्यांची तयारी प्रभावी व्हावी आणि अभ्यासाची प्रक्रिया ताणतणावमुक्त व्हावी, यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो.
आमचा दृष्टीकोन
आमचा दृष्टीकोन असा आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात दर्जेदार आणि उपयुक्त शैक्षणिक साहित्य पोहोचावे. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना देखील शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणेच उत्कृष्ट तयारीची साधने मिळावीत, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. भविष्यात आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्म्सद्वारे अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची, त्यांना आधुनिक शिक्षण पद्धतींचा लाभ देण्याची आणि शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यासोबत उभे राहण्याची योजना आखत आहोत. महाराष्ट्रातील सर्वात विश्वासार्ह आणि विद्यार्थी-केंद्रित प्रकाशन संस्था म्हणून नावारूपास येणे हे आमचे अंतिम उद्दिष्ट आहे.
मूल्ये
गुणवत्ता
प्रत्येक पुस्तकात अद्ययावत, अचूक आणि विद्यार्थ्यांच्या गरजांना अनुरूप माहिती देण्याची वचनबद्धता.
गुणवत्ता
प्रत्येक पुस्तकात अद्ययावत, अचूक आणि विद्यार्थ्यांच्या गरजांना अनुरूप माहिती देण्याची वचनबद्धता.
गुणवत्ता
प्रत्येक पुस्तकात अद्ययावत, अचूक आणि विद्यार्थ्यांच्या गरजांना अनुरूप माहिती देण्याची वचनबद्धता.
गुणवत्ता
प्रत्येक पुस्तकात अद्ययावत, अचूक आणि विद्यार्थ्यांच्या गरजांना अनुरूप माहिती देण्याची वचनबद्धता.